मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी पाच जणांना अटक   

कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली असून, अटक केलेल्यांची एकूण संख्या ३०७ झाली आहे.  
 
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज, सुती, धुलियान आणि जंगीपुरी येथे ११ आणि १२ एप्रिल रोजी वक्फ दुरुस्ती कायद्याला विरोध करताना झालेल्या हिंसाचारात जातीय संघर्ष झाला. या दंगलीत तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. हिंसाचाराच्या घटनांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, या पाच जणांचा दंगलीत सहभाग होता आणि आम्ही त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी झियाउल शेखच्या धाकट्या मुलाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो सध्या ओडिशा पोलिसांच्या ताब्यात आहे.

Related Articles